Special Day २९ ऑगस्ट : इतिहासात आजचा दिवस; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली १९४७ साली घटना समिती स्थापन झाली.

  ७०८: जपानमध्ये पहिल्यांदा तांब्याची नाणी बनवली गेली.

  १४९८: वास्को द गामा कालिकतहुन पोर्तुगालला परत निघाला.

  १८२५: पोर्तुगालने ब्राझीलच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.

  १८३१: मायकेल फॅरेडे याने विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा शोध लावला.

  १८३३: युनायटेड किंगडमच्या साम्राज्यात गुलामगिरीवर बंदी घातली.

  १८९८: गुडईयर कंपनीची स्थापना झाली.

  १९१८: टिळकांनी मुंबई येथे काँग्रेसचे विशेष अधिवेशन बोलावले.

  १९४७: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना समिती स्थापन झाली.

  १९६६: द बीटल्स यांनी शेवटचा स्टेज शो केला.

  १९७४: चौधरी चरणसिंग यांनी भारतीय लोक दल या राजकीय पक्षाची स्थापना केली.

  २००४: मायकेल शुमाकर यांनी पाचव्यांदा फॉर्मुला वन ड्राईव्हर्स चॅम्पियनशिप जिंकले.