५ ऑक्टोबर : पंडित नेहरुंच्या हस्ते १९५५ साली ‘हिंदुस्तान मशिन टूल्स’ या कारखान्याचे उद्‍घाटन करण्यात आले. भारताच्या औद्योगिक विकासात या कारखान्याचे स्थान महत्त्वाचे मानले जाते.

  घटना.

  १८६४ : भीषण चक्री वादळामुळे कोलकाता शहर उद्धवस्त होऊन सुमारे ६०,००० लोक ठार झाले.

  १९१० : पोर्तुगालमधील राजसत्ता संपुष्टात येऊन ते प्रजासत्ताक बनले.

  १९४८ : अश्गाबात येथील भूकंपात सुमारे १,१०,००० लोक ठार झाले.

  १९५५ : पंडित नेहरुंच्या हस्ते हिंदुस्तान मशिन टूल्स या कारखान्याचे उद्‍घाटन झाले. भारताच्या औद्योगिक विकासात या कारखान्याचे स्थान महत्त्वाचे मानले जाते.

  १९६२ : डॉ. नो हा पहिला जेम्सबाँड चित्रपट प्रदर्शित झाला.

  १९८९ : मीरासाहेब फातिमा बिबी या सर्वोच्‍च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश बनल्या.

  १९९५ : कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांना जाहीर.

  १९९८ : डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार जाहीर.