७ ऑक्टोबर : पुण्यात १९०५ साली विलायती कपड्यांची होळी करण्यात आली. परदेशी मालावर बहिष्कार घालण्यासाठी केलेला अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्‍न होता.

    घटना.

    ख्रिस्त पूर्व ३७६१: हिब्रू दिनदर्शिकेनुसार जगाचा पहिला दिवस.

    १९०५: पुण्यात विलायती कपड्यांची होळी करण्यात आली. परदेशी मालावर बहिष्कार घालण्यासाठी केलेला अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्‍न होता.

    १९१२: हेलसिंकी स्टॉक एक्सचेंज सुरू झाले.

    १९१९: महात्मा गांधींनी नवजीवन हे वृत्तपत्र सुरू केले.

    १९१९: के. एल. एम. (KLM) या विमान कंपनीची स्थापना झाली.

    १९३३: पाच छोट्या कंपन्यांचे एकत्रीकरण करुन एअर फ्रान्स ही कंपनी स्थापण्यात आली.

    १९४९: जर्मन डेमॉक्रेटिक रिपब्लिकची (पूर्व जर्मनी) स्थापना.

    १९७१: ओमानचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

    १९९६: फॉक्स न्यूज चॅनलचे प्रसारण सुरू होते.

    २००१: सप्टेंबर ११ च्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला चढवला.

    २००२: सलमान खान यांची वांद्रे पोलिसांत अटक.