८ ऑक्टोबर : काश्मीरमध्ये २००५ साली झालेल्या 7.6 Richter Scale भूकंपामुळे सुमारे ८६ ते ८७ हजार लोक मृत्युमुखी पडले.

    घटना.

    १९३२ : इंडियन एअर फोर्स अ‍ॅक्ट द्वारे भारतीय वायूदलाची स्थापना झाली.

    १९३९ : दुसरे महायुद्ध – जर्मनीने पोलंडचा पश्चिम भाग ताब्यात घेतला.

    १९५९ : स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुणे विद्यापीठाने सन्माननीय डी-लिट पदवी घरी येऊन दिली.

    १९६२ : अल्जीरीयाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

    १९६२ : नाट्य निकेतन निर्मित, आचार्य अत्रे लिखित व प्रभाकर पणशीकर दिग्दर्शित तो मी नव्हेच या नाटकाचा पहिला प्रयोग दिल्ली येथील आयफॅक्स थिएटर येथे झाला.

    १९७८ : ऑस्ट्रेलियाच्या केन वॉर्बीने पाण्यावर ३१७.६० तशी मैल वेगाचा विक्रम केला.

    १९८२ : पोलंडने सॉलिडॅरिटी व इतर सर्व कामगार संघटनांवर बंदी घातली.

    २००१ : सप्टेंबर ११ च्या अतिरेकी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाची (Department of Homeland Security) स्थापना केली.

    २००५ : काश्मीर मध्ये झालेल्या ७.६ रिश्टर भूकंपा मुळे सुमारे ८६,००० – ८७,५०० लोक मृत्युमुखी पडले, ६९,०००- ७२,५०० जण जखमी झाले आणि २.८ दशलक्ष लोक बेघर झाले.