दिनविशेष दि. १२ एप्रिल : सी. सुब्रमण्यम यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला

    घटना.

    १६०६: ग्रेट ब्रिटनने यूनियन जॅक ला राष्ट्रीय ध्वज म्हणून मान्यता दिली.

    १९३५: प्रभात चा चंद्रसेना हा हिंदी चित्रपट मुंबईच्या मिनर्व्हा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

    १९४५: अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांचे कार्यालयात असतानाच निधन झाले.

    १९६१: रशियाचे युरी गागारिन अंतराळात भ्रमण करणारे पहिला अंतराळवीर असून त्यांनी १०८ मिनिटात पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.

    १९६७: कैलाशनाथ वांछू भारताचे १० वे सरन्यायाधीश झाले.

    १९९७: भारताचे पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी राजीनामा दिला.

    १९९७: पूर्वप्राथमिक प्रवेशाकरिता पाल्य अथवा पालकांच्या मुलाखती घेण्यास मनाई करण्याची तरतूद असणारे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले.

    १९९८: सी. सुब्रमण्यम यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला.

    २००९: झिम्बाब्वेने अधिकृतरीत्या झिम्बाब्वेचे डॉलर हे चलन सोडून दिले.