दिनविशेष दि. १४ एप्रिल : चिमाजी अप्पा यांनी अद्वितीय पराक्रम करुन जंजिर्‍याच्या सिद्दीसाताचा पराभव केला

    घटना.

    १६६१:  प्रिन्स सेसी या शास्त्रज्ञाने प्रथमच दुर्बिणीसाठी टेलिस्कोप ही संज्ञा वापरली.

    १६६५:  सुप्रसिद्ध पुरंदरच्या वेढ्यामधे दिलेरखान पठाणने वज्रमाळ किल्ला जिंकला.

    १७३६:  चिमाजी अप्पा यांनी अद्वितीय पराक्रम करुन जंजिर्‍याच्या सिद्दीसाताचा पराभव केला.

    १९१२:  आर. एम. एस. टायटॅनिक हे जहाज रात्री ११:४० वाजता (स्थानिक वेळ) उत्तर अटलांटिक महासागरात एका हिमनगावर धडकले.

    १९४४:  मुंबई गोदीत उभ्या असलेल्या फोर्ट स्टिकिन या मालवाहू जहाजावर दुपारी ४ वाजुन ५ मिनिटांनी भीषण स्फोट होऊन ३०० जण ठार झाले आणि (त्याकाळच्या) सुमारे २ कोटी पौंड इतके आर्थिक नुकसान झाले.

    १९९५:  टेबल टेनिसमधे सलग ६,६७० रॅलीज करण्याचा जागतिक विक्रम डॉ. रमेश बाबू यांनी पुण्यात नोंदवला.