दिनविशेष दि. २६ एप्रिल : आशियाई विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या निशा मोहोताने इंटरनॅशनल वुमन मास्टर किताब मिळवला

    घटना.

    १९०३: अटलेटिको माद्रिद असोसिएशन फुटबॉल क्लबची स्थापना झाली.

    १९३३: नाझी जर्मनीच्या गेस्टापो या गुप्त पोलिसदलाची स्थापना झाली.

    १९६२: रेंजर-४ हे नासाचे यान चंद्रावर कोसळले.

    १९६४: टांगानिका झांजीबार मिळून टांझानिया देश तयार झाला.

    १९७०: जागतिक बौद्धिक मालमत्ता संघटना स्थापन करणारया अधिवेशनाची अंमलबजावणी झाली.

    १९७३: अजित नाथ रे भारताचे १४ वे सरन्यायाधीश झाले.

    १९८६: रशियातील चेर्नोबिल येथील अणुभट्टीत भीषण स्फोट होऊन किरणोत्सारी पदार्थ वातावरणात फेकले गेले.

    १९८९: बांगलादेशमधे चक्रीवादळामुले सुमारे १,३०० लोक ठार, १२,००० जखमी आणि ८०,००० बेघर झाले.

    १९९५: आशियाई विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या निशा मोहोताने इंटरनॅशनल वुमन मास्टर किताब मिळवला.

    २००५: आंतरराष्ट्रीय समुदायाच्या दबावामुळे सीरीयाने लेबाननमधुन सैन्य काढुन घेतले.