दिनविशेष दि. ५ एप्रिल : कम्युनिस्ट पक्षाने भारतात प्रथमच केरळमध्ये निवडणूका जिंकल्या

    घटना.

    १६६३: दहा हजार फौजेसह पुण्याच्या लाल महालात तळ देऊन राहिलेला मोगल सुभेदार शाहिस्तेखान याच्यावर शिवाजी महाराजांनी दोनशे स्वारांसह अकस्मात छापा घातला. शाहिस्तेखान खिडकीतुन पळून गेल्याने बचावला; मात्र पळुन जाण्याच्या प्रयत्‍नात त्याची तीन बोटे तुटली. या प्रसंगापासून मराठीत जिवावरचे बोटावर निभावले हा शब्दप्रयोग रुढ झाला.

    १६७९: राजारामास पकडण्यासाठी झुल्फिकारखानाने रायगडास वेढा दिला असता राजाराम रायगडावरुन प्रतापगडास गेला. पुढे प्रतापगडासही शत्रूने वेढा दिल्यावर राजारामास पन्हाळगडावर जावे लागले.

    १९५७: कम्युनिस्ट पक्षाने भारतात प्रथमच केरळमध्ये निवडणूका जिंकल्या आणि इ. एम. एस. नंबुद्रीपाद हे केरळचे मुख्यमंत्री झाले.

    २०००: अभिनेत्री सुलोचना यांच्या हस्ते डी. डी. – १० या मराठी उपग्रह वाहिनीचे सह्याद्री असे नामकरण करण्यात आले.

    २०००: जळगाव नगरपालिकेच्या १७ माजली इमारतीचे उद्घाटन.