दिनविशेष दि. २० डिसेंबर; आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस

आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस

१९२४: अडोल्फ हिटलर यांची लँड्सबर्ग तुरुंगातून सुटका.

१९४२: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी कलकत्ता शहरावर बॉम्बवर्षाव केला.

१९४५: मुंबई – बंगलोर प्रवासी विमानसेवा सुरू.

१९७१: झुल्फिकार अली भूट्टो हे पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष बनले.

१९९४: राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते मलेशियाचे पंतप्रधान डॉ. महाथीर मोहम्मद यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीचा जवाहरलाल नेहरू पुरस्कार प्रदान.

१९९९: पोर्तुगालने मकाऊ हे बेट चीनला परत दिले.

२०१०: भाषेबाबत मूलगामी अभ्यास करून त्यावर विविधांगी लिखाणे करणारे ज्येष्ठ भाषावैज्ञानिक व समीक्षक अशोक केळकर यांना मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर.