दिनविशेष दि. २१ फेब्रुवारी

    घटना.

    १८४२: जॉर्ज ग्रीनॉ यांना शिवणाच्या मशिनचे पेटंट मिळाले.

    १८४८: कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंजल्स यांनी साम्यवादाचा जाहीरनामा द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो प्रकाशित केला.

    १८७८: न्यू हेवन, कनेक्टिकट येथे पहिली टेलिफोन डिरेक्टरी प्रकाशित करण्यात आली.

    १९१५: लाहोर कट – लाहोर, बनारस व मीरत या ठिकाणी सशस्त्र क्रांतिकारी उठाव झाला.

    १९२५: द न्यूयॉर्कर या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.

    १९७२: सोव्हिएत संघाचे मानवरहित अंतराळयान लुना २० हे चंद्रावर उतरले.

    १९७५: जयश्री गडकर व बाळ धुरी यांचा विवाह झाला.

    २०१३: हैदराबाद मध्ये अनेक बॉम्बस्फोटांमध्ये किमान १७ जण ठार आणि ११९ जण जखमी झाले.