दिनविशेष दि. २२ फेब्रुवारी

    घटना.

    १८१९ : स्पेनने फ्लोरिडा हा प्रांत अमेरिकेला ५० लाख डॉलरच्या मोबदल्यात विकला.

    १९४२ : दुसरे महायुद्ध – फिलिपाईन्समध्ये जपानी सैन्याकडुन पराभव अटळ दिसत असल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एफ. डी. रूझवेल्ट यांनी जनरल डग्लस मॅकआर्थरला माघार घ्यायचा हुकुम दिला.

    १९४८ : झेकोस्लोव्हाकिया मध्ये कम्युनिस्ट क्रांती.

    १९५८ : इजिप्त आणि सीरिया या देशांनी एकत्र येऊन युनायटेड अरब प्रजासत्ताक तयार केले.

    १९७८ : यशवंत विष्णू चंद्रचूड यांनी भारताचे १६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

    १९७९: सेंट लुशिया ला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले.