दिनविशेष : ०६ जून २०२१; गोखले इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सची स्थापना करण्यात आली.; वाचा, आजच्या दिवसातील इतिहासातल्या घडामोडी!

  घटना.

  १६७४ : रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.

  १८०८ : जोसेफ बोनापार्ते यांना स्पेनचा राजा म्हणून घोषित करण्यात आले.

  १८३३ : रेल्वेमधून प्रवास करणारे अँड्र्यू जॅक्सन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.

  १८८२ : मुंबईत चक्रीवादळ. १,००,००० हून अधिक ठार.

  १९३० : गोखले इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सची स्थापना.

  १९३३ : अमेरिकेत कॅम्डेन, न्यूजर्सी येथे प्रथम ड्राइव्ह इन थिएटर सुरू.

  १९४४ : ‘डी डे’, दुसऱ्या महायुद्धात मित्रराष्ट्रांनी फ्रान्समधल्या नॉर्मेडी इथल्या जर्मन छावणीवर, एकाच रात्रीत जमीन, समुद्र आणि आकाशतून हल्ला करून हजारो सॆनिक मारले व हजारो कॆद केले.

  १९६८ : रॉबर्ट एफ. केनेडींचा खून.

  १९६९ : वि. स. पागे समितीची शिफारस, रोजगार हमी योजनेस सुरुवात.

  १९७० : सी. हेेंकेल या ब्रिटिश शास्त्रज्ञाने सर्वप्रथम घरगुती वापरासाठीचा डिटर्जंट साबण विक्रीस उपलब्ध केला.

  १९७१ : सोव्हिएत संघाने सोयुझ-११ चे प्रक्षेपण केले.

  १९७४ : स्वीडनने संसदीय राजेशाही स्वीकारली.

  १९८२ : इस्त्रायलने लेबनॉनवर आक्रमण केले.

  १९८४ : ऑपरेशन ब्ल्यू स्टार समाप्त. ५७६ ठार, ३३५ जखमी.

  १९९३ : मंगोलियात सर्वप्रथम राष्ट्राध्यक्षीय निवडणुका.

  २००४ : भारताच्या राष्ट्रपतींनी तमिळ शास्त्रीय भाषा म्हणून घोषित केली.