दिनविशेष : ०७ जून, २०२१ ; महात्मा गांधीं यांनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली. ; जाणून घ्या, आजच्या दिवसातील इतिहासातल्या घडामोडी!

  घटना.

  १८९३ : महात्मा गांधीं यांनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली.

  १९३८ : डी. सी. ४ प्रकारच्या विमानाचे प्रथम उड्डाण.

  १९६५ : अमेरिकेच्या सर्वोच्‍च न्यायालयाने परिणित दांपत्याने गर्भनिरोधक साधने वापरणे कायदेशीर ठरवले.

  १९७५ : क्रिकेटच्या पहिल्या विश्वकरंडक स्पर्धेस इंग्लंडमध्येे सुरुवात झाली.

  १९७९ : रशियातील कापुस्तिनयार येथून भास्कर-१ उपग्रहाचे प्रक्षेपण.

  १९८१ : इस्रायलने इराकची ओसिराक परमाणू भट्टी नष्ट केली.

  १९८५ : विम्बल्डन पुरुष एकेरीचे विजेतेपद १७ व्या वर्षी मिळवणारा बोरिस बेकर हा सर्वात तरुण खेळाडू बनला.

  १९९१ : फिलिपाइन्स मधल्या माउंट पिनाटुबो ज्वालामुखीचा उद्रेक.

  १९९४ : आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या (IMF) उपव्यवस्थापकीय संचालकपदी अर्थतज्ज्ञ प्रभाकर नार्वेकर या प्रथमच एका भारतीयाची नियुक्ती झाली.

  २००१ : युनायटेड किंग्डम मधील निवडणुकांत टोनी ब्लेरच्या नेतृत्वाखाली लेबर पार्टीला मोठे बहुमत.

  २००४ : शिरोमणी अकाली दल (लॉँगोवाल) या राजकीय पक्षाची स्थापना.

  २००६ : अल कायदाचा इराकमधील म्होरक्या अबू मुसाब अल झरकावी हा अमेरिकन हवाईदलाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात ठार झाला.