दिनविशेष : ०८ जून, २०२१; पहिल्यांदा जागतिक महासागर दिन साजरा केला गेला. ; जाणून घ्या, आजच्या दिवसातील इतिहासातल्या घडामोडी!

  घटना.

  १६७० : पुरंदरच्या तहात गमावलेला रोहिडा किल्ला शिवाजी महाराजांनी परत जिंकून घेतला.

  १६२४ :  पेरू येथे भूकंप.

  १७०७ : औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुअज्जम आणि आझमशाह या त्याच्या दोन मुलांमधे दिल्लीच्या तख्तासाठी युद्ध झाले. यात मुअज्जमने आझमशाहला ठार करुन दिल्लीची गादी बळकावली.

  १७१३ : मुघलांनी १६८९ मधे जिंकलेला रायगड किल्ला पंतप्रतिनिधी यांनी सिद्दीकडुन राजकारणाने जिंकुन घेतला.

  १७८३ : आईसलँड मधील लाकी ज्वालामुखीचा उद्रेक, हजार ठार.

  १९१२ : कार्ल लेम्ले यांनी यूनिव्हर्सल पिक्चर्स या कंपनीची स्थापना केली.

  १९१५ : लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना लिहुन पूर्ण केलेल्या गीतारहस्य या ग्रंथाचे गायकवाडवाड्यात प्रकाशन झाले.

  १९१८ : नोव्हा अ‍ॅक्‍विला या सर्वाधिक तेजस्वी तेजोमेघाचा शोध.

  १९४१ : दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी सीरीया व लेबानॉन पादाक्रांत केले.

  १९४८ : एअर इंडिया ची मुंबई – लंडन विमानसेवा सुरू झाली.

  १९४८ : जॉर्ज ऑर्वेलची १९८४ या नावाची कांदबरी प्रसिद्ध झाली.

  १९५३ : कृष्णवर्णीयांना हॉटेलमधे सेवा नाकारण्यास अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली.

  १९६९ : लष्करप्रमुख म्हणून सॅम माणेकशा यांची नियुक्ती.

  १९९२ : पहिल्यांदा जागतिक महासागर दिन साजरा केला गेला.

  २००४ : आधुनिक काळातील शुक्राचे (सूर्यावरुन) पहिले अधिक्रमण झाले. याआधीचे अधिक्रमण १८८२ या वर्षी झाले होते.