दिनविशेष : ०२ जून २०२१; तेलंगण भारताचे २९वे राज्य झाले. ; वाचा, आजच्या दिवसातील इतिहासातल्या घडामोडी!

  घटना.

  १८०० : कॅनडात जगातील सर्वप्रथम कांजिण्याची लस देण्यात आली.

  १८९६ : गुग्लियेमो मार्कोनीला रेडिओचे पेटंट बहाल.

  १८९७ : आपल्या मृत्यूचे वृत्त वर्तमानपत्रात वाचून मार्क ट्वेन म्हणाले, माझ्या मृत्यूचे वृत्त ही अतिशयोक्ती आहे.

  १९४६ : राजा उंबेर्तो-२ ला हटवून इटलीने राजेशाही संपवली स्वतःला प्रजासत्ताक घोषित केले.

  १९४९ : दक्षिण अफ्रिकेने गोरे सोडुन इतरांना दुय्यम नागरिक ठरवण्याचा कायदा केला.

  १९५३ : इंग्लंडमध्ये राणी एलिझाबेथ दुसरीचा राज्याभिषेक.

  १९७९ : पोप जॉन पॉल (दुसरे) यांनी (आपल्या मायदेशाला) पोलंडला भेट दिली. कम्युनिस्ट राष्ट्राला भेट देणारे ते पहिलेच पोप होत.

  १९९९ : भूतानमध्ये दूरचित्रवाणी प्रसारण सुरू.

  २००० : लेखिका अमृता प्रीतम यांना दिल्ली सरकारचा अकरा लाख रुपयांचा सहस्रकातील कवयित्री हा पुरस्कार जाहीर.

  २०१४ : तेलंगण भारताचे २९वे राज्य झाले.