दिनविशेष दि. १३ मार्च; जालियनवाला बाग हत्याकांडाचे समर्थन करणारे पंजाबचे गव्हर्नर मायकेल ओडवायर यांची उधमसिंग यांनी गोळया घालून हत्या केली

  घटना.

  १७८१ : विल्यम हर्षेल यांनी युरेनसचा शोध लावला.

  १८९७ : सॅन डीयेगो विद्यापीठाची स्थापना झाली.

  १९१० : पॅरिसहुन लंडनला येताच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अटक झाली.

  १९३० : क्लाईड डब्ल्यू. टॉमबॉग यांनी प्लुटो ग्रह शोधल्याचे हार्वर्ड विद्यापीठातील वेधशाळेला कळवले.

  १९४० : अमृतसर येथील जालियनवाला बाग हत्याकांडाचे समर्थन करणारे पंजाबचे गव्हर्नर मायकेल ओडवायर यांची उधमसिंग यांनी गोळया घालून हत्या केली.

  १९९७ : मदर तेरेसा यांच्या वारस म्हणून सिस्टर निर्मला यांची निवड करण्यात आली.

  १९९९ : कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याचे उद्घाटन झाले.

  २००३ : मुंबई शहरातील लोकल रेल्वेमध्ये बॉम्बस्फोट झाले.

  २००७ : वेस्ट इंडीजमधे ९ व्या क्रिकेट विश्वकरंडक क्रिकेटस्पर्धेचे उद्‍घाटन झाले.