दिनविशेष दि. १६ मार्च

    घटना.

    १५२१ : फर्डिनांड मॅगेलन जगप्रदक्षिणा करीत फिलिपाईन्सला पोहोचला.

    १५२८ : फत्तेपूर सिक्री येथे राणा संग आणि बाबर यांच्यात युद्ध होऊन राणा संग यांचा पराभव झाला.

    १६४९ : शहाजीराजांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी शहजादा मुराद (शहाजहानचा मुलगा) यास पत्र लिहीले.

    १९११ : भारतात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याचा ठराव गोपाळकृष्ण गोखले यांनी मांडला.

    १९३७ : महाड येथील चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा दलितांना हक्क असण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला.

    १९४३: प्रभात चा नई कहानी हा चित्रपट रिलीज झाला.

    १९४५: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने तुफानी बॉम्बफेक करून जर्मनीच्या वुर्झबर्ग शहराचा २० मिनीटांत विनाश केला.

    १९६६: अमल कुमार सरकार यांनी भारताचे ८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

    १९७६: इंग्लंडचे पंतप्रधान हेरॉल्ड विल्सन यांनी राजीनामा दिला.

    २०००: भारतीय हॉकीपटू धनराज पिल्ले आणि मध्य अंतराची धावपटू ज्योतिमय सिकदर यांना के. के. बिर्ला पुरस्कार जाहीर केला.

    २००१: नेल्सन मंडेला यांना गांधी शांतता पुरस्कार देण्यात आला.