दिनविशेष दि. २४ मार्च; देवगिरीचा वैभवशाली सम्राट रामदेवराव यादव यास मलिक काफूरने कैद करुन दिल्लीला नेले

    घटना.

    १३०७:  देवगिरीचा वैभवशाली सम्राट रामदेवराव यादव यास मलिक काफूरने कैद करुन दिल्लीला नेले.

    १६७७:  दक्षिण दिग्विजयप्रसंगी शिवाजी महाराजांनी श्री शैल्य मल्लिकार्जुन येथे मुक्काम केला.

    १८३७:  कॅनडा देशाने आफ्रिकन कॅनेडियन लोकांना मतदानाचा अधिकार दिला.

    १८५५ :  आग्रा आणि कलकत्ता या शहरांदरम्यान तारसेवा सुरू झाली.

    १८९६ :  अ.एस. पोपोव यांनी इतिहासात पहिल्यांदाच रेडिओ सिग्नल चे प्रसारण केले.

    १९२३:  ग्रीस हे राष्ट्र प्रजासत्ताक बनले.

    १९२९ :  लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन सुरु झाले.

    १९७७ :  स्वातंत्र्यानंतर पहिलेच बिगर काँग्रेसचे सरकार येऊन मोरारजी देसाई पंतप्रधान झाले.

    १९९३ :  शूमाकर-लेव्ही-९ या धूमकेतुचा शोध लागला. हा धूमकेतु जुलै महिन्यात गुरु ग्रहावर जाऊन आदळला.

    १९९८ :  टायटॅनिक चित्रपटाला विक्रमी ११ ऑस्कर पुरस्कार मिळाले.

    २००८ :  भूतान हे लोकशाही राष्ट्र बनले व प्रथमच निवडणुका घेण्यात आल्या.