दिनविशेष : १६ मे २०२१; भारताचे १० वे पंतप्रधान म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांनी सूत्रे हाती घेतली. मात्र आवश्यक पाठिंबा न मिळाल्यामुळे त्यांचे सरकार केवळ १३ दिवस टिकले; वाचा आजचे दिनविशेष!

    घटना.

    १६६५ : पुरंदर किल्ल्यास दिलेरखानाने घातलेला वेढा तोडण्याच्या प्रयत्‍नात मुरारबाजी यांचा मृत्यू.

    १८६६ : अमेरिकेत पाच सेन्ट किंवा निकेल हे नाणे व्यवहारात आणले.

    १८९९: क्रांतिकारक बाळकृष्ण चाफेकर यांना फाशी.

    १९२९ : हॉलिवूडच्या अ‍ॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर, आर्ट्‌स अँड सायन्सेस या संस्थेतर्फे चित्रपटांतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्मृतिचिन्ह देण्याचा पहिला समारंभ झाला. याच पारितोषिकांना पुढे ऑस्कर असे नाव पडले.

    १९६९ : सोविएत रशियाचे व्हेनेरा-५ हे मानवविरहित अंतराळयान शुक्रावर उतरले.

    १९७५ : सिक्कीम भारतात विलीन झाले.

    १९७५ : जपानची जुंको तबेई ही माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला बनली.

    १९९३ : बचेन्द्री पालच्या नेतृत्वाखालील पहिल्या महिला भारतीय मोहिमेने सात मुलींसह अठरा गिर्यारोहकांना एव्हरेस्ट पादाक्रांत करण्याचा मान मिळवून दिला व नवा जागतिक विक्रम नोंदविला.

    १९९६ : भारताचे १० वे पंतप्रधान म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांनी सूत्रे हाती घेतली. मात्र आवश्यक पाठिंबा न मिळाल्यामुळे त्यांचे सरकार केवळ १३ दिवस टिकले.

    २००० : बॅडमिंटन अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी तसेच खेळांचे दूरचित्रवाणी प्रसारण सुलभ करण्यासाठी या खेळातील गेम १५ ऐवजी ७ गुणांचा करण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाच्या क्‍वालालंपूर येथील बैठकीत घेण्यात आला. मात्र २००६ मधे हा नियम परत बदलला गेला.

    २००५ : कुवेतमधे स्त्रियांना प्रथमच मतदानाचा हक्क प्राप्त झाला.

    २००७ : निकोलाय सारकॉझी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष बनले.