दिनविशेष दि. २ मे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बंधू बाबाराव व तात्याराव यांची अंदमानातून हिन्दुस्थानात पाठवणी करण्यात आली

    घटना.

    १९०८: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लंडनमध्ये प्रथमच शिवजयंती उत्सव साजरा केला.

    १९१८: जनरल मोटर्सने शेवरले मोटर कंपनी विकत घेतली.

    १९२१: स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बंधू बाबाराव व तात्याराव यांची अंदमानातून हिन्दुस्थानात पाठवणी करण्यात आली.

    १९४५: दुसरे महायुद्ध – सोविएत सैन्याने बर्लिनचा पाडाव केला.

    १९९४: बँक ऑफ कराड चे बँक ऑफ इंडिया मधे विलिनीकरण झाले.

    १९९४: नगर जिल्ह्यातील रामदास ढमाले या अपंग युवकाने पुण्यातील टिळक तलावात सलग ३७ तास ४५ मिनिटे पोहून एक नवा विक्रम प्रस्थापित केला.

    १९९७: टोनी ब्लेअर इंग्लंडचे पंतप्रधान बनले.

    १९९७: राष्ट्रीय अ बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याच्या अभिजित कुंटेने इंटरनॅशनल मास्टर किताबासाठीचे निकष पूर्ण केले.

    १९९९: कोल्हापूर येथील शर्वरी मानसिंग पवार या तीन वर्षे चार महिन्याच्या बालिकेने ५१.१ कि. मी. अंतर न थांबता स्केटिंग करुन ३ तास ५१ मिनिटांत पार केले.

    १९९९: मीरा मोस्कोसो पनामा देशाच्या अध्यक्ष म्हणून निवडलेल्या पहिल्या महिला ठरल्या.

    २००४: एस. राजेन्द्रबाबू यांनी भारताचे ३४वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

    २०११: अमेरिकन सैन्याच्या Navy Seals 6 या विशेष तुकडीने ओसामा बिन लादेन याची पाकिस्तानातील अ‍ॅबोटाबाद येथे हत्या केली.

    २०१२: नॉर्वेजियन चित्रकार एडवर्ड माँच यांचे द स्क्रीम हे चित्र लिलावात १२० मिलियन डॉलर्सला विकले गेले. हा एक नवा जागतिक विक्रम बनला.