दिनविशेष : २२ मे २०२१;  बचेन्द्री पालने २२ मे, १९८४ साली दुपारी १:०९ वाजता (भारतीय प्रमाण वेळ) माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केले. हे शिखर सर करणारी ती पहिली भारतीय महिला आहे. वाचा, आजच्या दिवसातील इतिहासातल्या घडामोडी !

  घटना.

  १७३७ : पोर्तुगीजांकडुन जिंकल्यानंतर पेशव्यांनी अर्नाळा किल्ला परत बांधून घेतला.

  १८२९ : सिरील डेमियनला अ‍ॅकॉर्डियन या वाद्याचे पेटंट मिळाले.

  १९४९ : पश्चिम जर्मनी हे राष्ट्र अस्तित्त्वात आले.

  १९५१ : तिबेट देशाने चीनबरोबर तिबेटच्या शांततेत मुक्तीसाठी सतरा बिंदू करार केला.

  १९५६ : आयुर्विमा व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण करण्यासंबंधीचे विधेयक मंजूर झाले.

  १९८४ : बचेन्द्री पालने दुपारी १:०९ वाजता (भारतीय प्रमाण वेळ) माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केले. हे शिखर सर करणारी ती पहिली भारतीय महिला आहे.

  १९९५ : जावा प्रोग्रामिंग लँग्वेज ची पहिली आवृत्ती प्रकाशीत केली गेली.

  १९९७ : माऊंट एव्हरेस्ट हे सर्वोच्‍च शिखर सर्वप्रथम सर करणार्‍या तेनसिंग नोर्गे यांचे नातू ताशी तेनसिंग यांनी माऊंट एव्हरेस्ट सर केले.