दिनविशेष : २२ मे २०२१; भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (ISRO) विकसित केलेला ‘इन्सॅट-३ बी’ हा उपग्रह पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण करण्यात आला; वाचा, आजच्या दिवसातील इतिहासातल्या घडामोडी !

    घटना. 

    १६२६ : पीटर मिन्युईटने स्थानिक लोकांकडून मॅनहटन बेट २४ डॉलरला विकत घेतले.

    १८४४ : तारायंत्राचे संशोधक सॅम्युअल मोर्स यांनी स्वत: विकसित केलेल्या सांकेतिक भाषेत पहिला संदेश वॉशिंग्टन येथून बाल्टिमोर येथे पाठवला.

    १८८३ : न्यूयॉर्क मधील ब्रूकलिन ब्रिज वाहतुकीस खुला झाला.

    १९४० : इगोर सिकोरसकी यांनी एका-रोटर हेलिकॉप्टर चे यशस्वी उड्डाण केले.

    १९७६ : ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणार्‍या काँकॉर्ड विमानाची लंडन ते न्यूयॉर्क अशी सेवा सुरू झाली.

    १९९१ : एरिट्रियाला इथिओपियाकडून स्वातंत्र्य मिळाले.

    १९९४ : २६ फेब्रुवारी १९९३ रोजी न्यूयॉर्क येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणणार्‍या चार मुस्लीम दहशतवाद्यांना प्रत्येकी २४० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

    २००० : भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (ISRO) विकसित केलेला इन्सॅट-३बी हा उपग्रह पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण.

    २००१ : १८ व्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणारा शेर्पा तेब्बा त्रेथी सर्वात लहान व्यक्ती ठरला.