दिनविशेष : २५ मे २०२१; सुमारे १०० वर्षांपासून पंढरपूरला येणार्‍या लाखो वारकर्‍यांची आणि नागरिकांची सेवा केलेल्या पंढरपूर-कुर्डुवाडी या नॅरोगेज रेल्वेला निरोप देण्यात आला; जाणून घ्या देश आणि जगातील आजच्या दिवसातील इतिहासातल्या घडामोडी !

    घटना.

    १६६६ : शिवाजी महाराज आग्रा येथे नजरकैदेत.

    १९५३ : अमेरिकेतील पहिले सार्वजनिक टेलिव्हिजन स्टेशन वरून अधिकृत पाने प्रसारण सुरू झाले.

    १९५५ : कांचनगंगा हे जगातील तिसरे सर्वोच्‍च शिखर प्रथमच जो ब्राऊन आणि जॉर्ज बॅन्ड या ब्रिटिश गिर्यारोहकांनी सर केले.

    १९६१ : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी हे दशक संपण्यापुर्वी चंद्रावर मानव उतरवण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येईल (Apollo Program) असे अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात जाहीर केले.

    १९६३ : इथिओपियातील आदिसाबाबा येथे ऑर्गनायझेशन ऑफ अफ्रिकन युनिटी (OAU) ची स्थापना झाली.

    १९७७ : चिनी सरकारने विल्यम शेक्सपिअरच्या साहित्यावरील बंदी उठवली. सुमारे १० वर्षे ही बंदी अमलात होती.

    १९८१ : सौदी अरेबियातील रियाध येथे गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (GCC) या संघटनेची स्थापना झाली. बहारिन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि यू. ए. ई. हे या संघटनेचे सदस्य देश आहेत.

    १९८५ : बांगलादेशात झालेल्या चक्रीवादळात अंदाजे १०,००० लोक ठार झाले.

    १९९२ : विख्यात बंगाली साहित्यिक सुभाष मुखोपाध्याय यांना १९९१ चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.

    १९९९ : सुमारे १०० वर्षांपासून पंढरपूरला येणार्‍या लाखो वारकर्‍यांची आणि नागरिकांची सेवा केलेल्या पंढरपूर-कुर्डुवाडी या नॅरोगेज रेल्वेला निरोप देण्यात आला.

    २०११ : द ओपराह विन्फ्रे शो चा शेवट करण्यात आला. ओपराह विन्फ्रे यांनी हा शो पंचवीस वर्ष चालवला होता.

    २०१२ : स्पेसएक्स ड्रॅगन हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकांसह यशस्वीरित्या एकत्र येणारे पहिले व्यावसायिक अंतराळयान ठरले.