दिनविशेष : २६ मे २०२१;  श्रीहरिकोटा येथून पी. एस. एल. व्ही. – सी. २ या धृवीय उपग्रहवाहकाने भारताचा आय. एस. एस. पी. ४ (ओशनसॅट), कोरियाचा किटसॅट व जर्मनीचा डी. एल. आर. – टबसॅट या तीन उपग्रहांना त्यांच्या कक्षेत यशस्वीरीत्या पोहोचवले; जाणून घ्या देश आणि जगातील आजच्या दिवसातील इतिहासातल्या घडामोडी !

  घटना.

  १८९६ : निकोलस (दुसरा) रशियाचा झार बनला.

  १९७१ : बांगलादेशातील सिल्हेट येथे पाकिस्तानी सैन्याने ७१ हिंदूंची कत्तल केली.

  १९८६ : युरोपियन समुदायाने (EU) नवीन ध्वज अंगीकारला.

  १९८९ : मुंबईजवळच्या न्हावा-शेवा बंदराचे उद्‍घाटन झाले.

  १९९९ : श्रीहरिकोटा येथून पी. एस. एल. व्ही. – सी. २ या धृवीय उपग्रहवाहकाने भारताचा आय. एस. एस. पी. ४ (ओशनसॅट), कोरियाचा किटसॅट व जर्मनीचा डी. एल. आर. – टबसॅट या तीन उपग्रहांना त्यांच्या कक्षेत यशस्वीरीत्या पोहोचवले.

  २०१४ : नरेंद्र मोदी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतली.