दिनविशेष : २८ मे २०२१; इटलीमध्ये लिओनार्डो दा विंची यांचे द लास्ट सपर हे चित्र प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले; वाचा, आजच्या दिवसातील इतिहासातल्या घडामोडी !

  घटना. 

  १४९० : मलिक अहमद या जुन्नर येथील बहामनी सेनापतीने उर्वरित बहामनी सैन्याचा पराभव करून जुन्नर येथे स्वतंत्र सल्तनतीची घोषणा केली.

  १९०७ : पहिली आइल ऑफ मॅन टीटी रेस आयोजित करण्यात आली.

  १९३७ : नेव्हिल चेंबरलेन इंग्लंडचे पंतप्रधान झाले.

  १९३७ : फोक्सवॅगन (व्ही.डब्ल्यू) जर्मन ऑटोमोबाइल उत्पादक कंपनी स्थापन झाली.

  १९४० : दुसरे महायुद्ध– बेल्जियमने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.

  १९५२ : ग्रीसमधे स्त्रियांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला.

  १९५८ : ७५ व्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा मुंबई महापालिकेतर्फे सत्कार करण्यात आला.

  १९६४ : पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन (PLO) ची स्थापना झाली.

  १९९८ : बलुचिस्तानच्या चगाई भागात पाकिस्तानने पाच यशस्वी अणूचाचण्या केल्या.

  १९९९ : इटली मध्ये लिओनार्डो दा विंची यांचे द लास्ट सपर हे चित्र प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले.