दिनविशेष : ३१ मे २०२१; दुसरे महायुद्ध – जपानी पाणबुड्यांनी सिडनी शहरावर हल्ल्यांचे सत्र सुरू केले. ; वाचा, आजच्या दिवसातील इतिहासातल्या घडामोडी !

  घटना.

  १९१० : दक्षिण अफ्रिकेला स्वातंत्र्य मिळाले.

  १९३५ :  पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील क्‍वेट्टा येथे झालेल्या ७.७ रिच्टर तीव्रतेच्या भूकंपात ५६,००० लोक ठार झाले.

  १९४२ : दुसरे महायुद्ध – जपानी पाणबुड्यांनी सिडनी शहरावर हल्ल्यांचे सत्र सुरू केले.

  १९५२ : संगीत नाटक अकादमी ची स्थापना.

  १९६१ : दक्षिण अफ्रिका प्रजासत्ताक बनले.

  १९७० : पेरू देशातील ७.९ तीव्रतेच्या भूकंपामुळे ७०,००० च्या दरम्यान मारले गेले आणि ५०,००० जण जखमी झाले.

  १९९० : नेल्सन मंडेला यांना लेनिन आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार जाहीर.

  १९९२ : प्रख्यात गुजराती कवी हरिंद्र दवे यांना १९९१ चा कबीर सन्मान मध्य प्रदेश सरकारकडून जाहीर.