दिनविशेष : २१ मे २०२१; राष्ट्रकुल संसदीय संघटनेच्या आशिया विभागाच्या अध्यक्षपदी लोकसभेचे सभापती जी. एम. सी. बालयोगी यांची एकमताने निवड झाली; जाणून घ्या आजच्या दिवसातील इतिहासातल्या घडामोडी

  घटना. 

  ५२६ : सिरीया आणि अँटोचियात झालेल्या एका भूकंपात सुमारे ३,००,००० लोकांचा मृत्यू.

  १४९८ : पोर्तुगीज खलाशी वास्को-द-गामा हे भारताच्या कालिकत (कलकत्ता) बंदरात दाखल झाले.

  १५४० : छायाचित्रकार अब्राहम ऑरटेलियस यांनी थॅट्रम ऑरबिस टेरारम हा पहिला आधुनिक ऍटलास प्रकाशित केला.

  १८७३ : लेव्ही स्ट्रॉस आणि जेकब डेव्हिस यांनी तांब्याची बटणे असलेल्या निळ्या जीन्स चे पेटंट घेतले.

  १८९१ : थॉमस एडीसन यांनी किनेटोस्कोप चे पहिला प्रोटोटाइप प्रदर्शित केले

  १९०२ : क्यूबा देश अमेरिकेपासून स्वातंत्र्य झाला.

  १९४८ : चिआंग काई शेक चीन गणराज्यचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडून आले.

  १९९६ : देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल माजी केंद्रीय अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांना ऑनेस्ट मॅन ऑफ द’इयर हा पुरस्कार जाहीर.

  २००० : राष्ट्रकुल संसदीय संघटनेच्या आशिया विभागाच्या अध्यक्षपदी लोकसभेचे सभापती जी. एम. सी. बालयोगी यांची एकमताने निवड झाली.

  २००१ : चित्रपट निर्माते व लेखक अण्णासाहेब देऊळगावकर यांना अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे चित्रभूषण पुरस्कार जाहीर