दिनविशेष २९ मार्च; ब्रिटिश साम्राज्याने पंजाब ताब्यात घेतले

    घटना.

    १८४९: ब्रिटिश साम्राज्याने पंजाब ताब्यात घेतले.

    १८५७: बेंगाल नेटिव्ह इन्फंट्रीच्या ३४ व्या तुकडीतील शिपाई मंगल पांडे याने इस्ट इंडिया कंपनीतील ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या.

    १९३०: प्रभात चा खूनी खंजिर हा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.

    १९६८: महात्मा फुले कृषी विद्यापीठाची (MPKV) राहुरी येथे स्थापना.

    १९७३: व्हिएतनाम युद्ध – व्हिएतनाममधुन शेवटचा अमेरिकन सैनिक बाहेर पडला.

    १९८२: एन. टी. रामाराव यांनी तेलगू देसम पक्षाची स्थापना केली.

    २०१४: इंग्लंड आणि वेल्स मध्ये प्रथम समलिंगी विवाह झाले.