‘वीजयुगाची सुरुवात’; ०४ सप्टेंबर : इतिहासात आजचा दिवस; थॉमस एडिसन यांनी १८८२ साली जगातील पहिल्या व्यावसायिक विद्युत ऊर्जा प्रकल्प चालू केले. ‘वीजयुगाची सुरुवात’ म्हणून हा दिवस ओळखला जातो.

  घटना :

  १८८२ : थॉमस एडिसन यांनी इतिहासातील पहिल्या व्यावसायिक विद्युत ऊर्जा प्रकल्प चालू केले. वीजयुगाची सुरुवात म्हणून हा दिवस ओळखला जातो.

  १८८८ : जॉर्ज इस्टमन याने कोडॅक फिल्म कॅमेऱ्याचे पेटंट घेतले.

  १९०९ : लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या स्काऊटचा पहिला मेळावा झाला.

  १९३७ : प्रभातच्या संत तुकाराम या चित्रपटाची जगातल्या तीन उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणून निवड झाली.

  १९७२ : मार्क स्पिटझ हा एकाच ऑलिम्पक स्पर्धेत ७ सुवर्णपदके मिळवणारा पहिला खेळाडू बनला.

  १९९८ : स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लॅरी पेज व सर्गेइ ब्रिन या दोन विद्यार्थ्यांनी गुगलची स्थापना केली.

  २००१ : हेवलेट पॅकर्ड या कंपनीने संगणक क्षेत्रातील कॉम्पॅक कॉर्पोरेशन ही बलाढ्य कंपनी २५ अब्ज डॉलर्सला विकत घेतली.

  २०१३ : रघुराम राजन यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे २३वे गव्हर्नर म्हणून पदभार हाती घेतला.