१५ जून दिनविशेष; संपूर्ण देशी बनावटीच्या सहा ‘अर्जुन’ रणगाड्यांची पहिली तुकडी लष्कराकडे सुपूर्द करण्यात आली. ; जाणून घ्या आजच्या दिवसाची वैशिष्ट्ये!

  घटना.

  १६६७ : वैद्यकीय इतिहासात प्रथमच जॉं बाप्तिस्ते डेनिस या डॉक्टरने १५ वर्षे वयाच्या एका फ्रेंच मुलाच्या शरीरात कोकराचे रक्त टोचले.

  १८४४ : चार्ल्स गुडइयरने रबराच्या व्हल्कनायझेशनचे पेटंट घेतले.

  १८६९ : महाराष्ट्रातील पहिला विधवा विवाह साजरा झाला.

  १९१९ : कॅप्टन जॉन अलकॉक, लेफ्टनंट आर्थर ब्राऊन यांनी विमानातून सर्वप्रथम अटलांटिक महासागर पार केला.

  १९७० : बा. पां. आपटे पुणे विद्यापीठाचे आठवे कुलगुरू झाले.

  १९९३ : संपूर्ण देशी बनावटीच्या सहा ‘अर्जुन’ रणगाड्यांची पहिली तुकडी लष्कराकडे सुपूर्द करण्यात आली.

  १९९४ : इस्त्रायल व व्हॅटिकन सिटी यांमधे पूर्ण राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.

  १९९७ : अजामीनपात्र गुन्ह्याचा आरोप असलेली व्यक्ती फरारी असेल, तर तिच्यावर आरोपपत्र दाखल नसतानाही न्यायमूर्ती अटक वॉरंट जारी करू शकतात असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला.

  २००१ : ग्रँडमास्टर विजयालक्ष्मी सुब्रह्मण्यम यांनी राष्ट्रीय ‘अ’ बुद्धिबळ स्पर्धा विक्रमी पाचव्यांदा जिंकली.

  २००८ : लेहमन ब्रदर्स या वित्तसंस्थेने दिवाळखोरी जाहीर केली.