इतिहासात आजचा दिवस; अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडगड जिंकले

  १३०३: अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडगड जिंकले (Allauddin Khilji conquered Chittorgarh).

  १४९८: मायकेल अँजेलो याने पिएटा या जगप्रसिद्ध शिल्पकृतीच्या कामास सुरूवात केली.

  १७६८: कॅप्टन जेम्स कूक पहिल्या सफरीवर निघाले.

  १७९१: जॉन फिच यांना स्टीमबोट साठी अमेरिकेचे पेटंट देण्यात आले.

  १८८३: सध्याचे इंडोनेशिया बेटावरील क्राकाटाऊ ज्वालामुखीच्या उद्रेकात १३६ गावे उध्वस्त ३६,००० लोकांचा बळी.

  १९४४: दुसरे महायुद्ध – चार्ल्स गॉलने पॅरिसमधे प्रवेश केला.

  १९७२: जर्मनीतील म्युनिच येथे २०व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात.

  १९९४: लोन टेनिसपटू रमेश कृष्णन आणि मध्यम पल्ल्याचा धावपटू बहादूर प्रसाद यांना के. के. बिर्ला फांउंडेशनचा पुरस्कार जाहीर.

  १९९६: दक्षिण कोरियात १९७९ मध्ये झालेल्या लष्करी कटाबद्दल माजी अध्यक्ष चुन दू वान यांना मृत्यूदंडाची तर त्यांचे उत्तराधिकारी प्रो ताय वू यांना साडेबावीस वर्षे कारावासाची शिक्षा.

  २०२०: फोर्ब्सच्या यादीनुसार ऍमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस हे २०० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक कमाई करणार्‍या इतिहासातील पहिले व्यक्ती ठरले.