इतिहासात आजचा दिवस; २०१४ मध्ये माळीण गावावर दरड कोसळून ५० ठार

कोणत्याही प्रवासी वाहनातून एखादा प्रवासी अपघाताने खाली पडून त्याचा मृत्यू झाल्यास त्याबद्दल त्या वाहनचालकाला जबाबदार धरता येणार नाही, असा सर्वोच्‍च न्यायालयाचा निकाल.

  ७६२: खलिफा अल मन्सूरने बगदाद शहराची स्थापना केली.

  १६२९: इटलीतील नेपल्स शहरात झालेल्या भूकंपात सुमारे १०,००० जण मृत्यूमुखी पडले.

  १८९८: विल्यम केलॉग यांनी कॉर्नफ्लेक्स विकसित केले.

  १९३०: पहिला फुटबॉल विश्वचषक उरुग्वेने जिंकला.

  १९६२: ट्रान्स कॅनडा हायवे हा सुमारे ८,०३० किमी लांबीचा जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला.

  १९७१: अपोलो १५ चंद्रावर उतरले.

  १९९७: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्‍भावना पुरस्कार जाहीर.

  २०००: चंदन तस्कर वीरप्पनने अभिनेते डॉ. राजकुमार यांचे अपहरण केले.

  २०००: कोणत्याही प्रवासी वाहनातून एखादा प्रवासी अपघाताने खाली पडून त्याचा मृत्यू झाल्यास त्याबद्दल त्या वाहनचालकाला जबाबदार धरता येणार नाही, असा सर्वोच्‍च न्यायालयाचा निकाल.

  २००१: जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.

  २०१२: दिल्लीतील पावर ग्रिड  खराब झाल्यामुळे उत्तर भारतील 30 कोटी पेक्षा जास्त लोकांची वीज खंडित झाली.

  २०१४: पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळून ५० ठार.