१४ जुलै, दिनविशेष : डाकतार विभागाने २०१३ साली १६० वर्षांपासूनची तार सेवा बंद केली.; जाणून घ्या आजच्या दिवसाचे महत्त्व

  घटना.

  १७८९ :  पॅरिस मध्ये नागरिकांनी फ्रेंच राज्यसत्तेचे दडपशाहीचे चिन्ह असलेल्या बॅस्टिल तुरुंगावर हल्ला केला आतील सात बंद्यांची मुक्तता केली. ही घटना म्हणजे फ्रेंच क्रांतीची मुहूर्तमेढ होती.

  १८६७ : आल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइट या स्फोटकाचे यशस्वी परीक्षण केले.

  १९५८ : इराक मध्ये राजेशाही विरुद्ध उठाव. अब्दुल करीम कासम सत्तेवर.

  १९६० : चिंपांझींचा अभ्यास करण्यासाठी जेन गुडॉल टांझानियातील अभयारण्यात दाखल झाल्या. ४५ वर्षे त्यांनी संशोधन केले.

  १९६९ : अमेरिकेने $500, $1,000, $5,000 व $10,000 च्या नोटा चलनातुन काढुन टाकल्या.

  १९७६ : कॅनडात मृत्युदंडाच्या शिक्षेवर बंदी घालण्यात आली.

  २००३ : जागतिक बुद्धिबळ महासंघ द्वारा सन्दीप चंदा यांना ग्रँडमास्टर पुरस्कार मिळाला.

  २०१३ : डाकतार विभागाची १६० वर्षांपासूनची तार सेवा बंद झाली.