१७ जुलै, दिनविशेष : मुंबईते रेवस जलवाहतूक करणाऱ्या रामदास या फेरीबोटीला जलसमाधी मिळून सुमारे ७०० लोक मृत्युमुखी. ; जाणून घ्या आजच्या दिवसाचे महत्त्व

    घटना.

    १८०२ : मोडी लिपीतून पहिल्यांदाच मुद्रण करण्यात आले.

    १८१९ : अ‍ॅडॅम्स-ओनिस करारानुसार फ्लोरिडा हे राज्य अमेरिकेने स्पेनकडुन ५ दशलक्ष डॉलर देऊन विकत घेतले.

    १८४१ : सुप्रसिद्ध पंच या विनोदी साप्ताहिकाचा पहिला अंक प्रकाशित.

    १९१७ : किंग जॉर्ज (पाचवा) यांनी फतवा काढून जाहीर केले की त्यांच्या वंशातील पुरुष मंडळी विंडसर हे आडनाव लावतील.

    १९४७ : मुंबईते रेवस जलवाहतूक करणाऱ्या रामदास या फेरीबोटीला जलसमाधी मिळून सुमारे ७०० लोक मृत्युमुखी.

    १९५५ : वॉल्ट डिस्ने यांनी कॅलिफोर्निया येथे डिस्नेलँड सुरू केले.

    १९७५ : अमेरिकेचे अपोलो रशियाचे सोयुझ ही दोन अंतराळयाने एकमेकांस जोडली गेली.

    १९७६ : कॅनडातील मॉन्ट्रिअल येथे २१ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात.

    १९९३ : तेलुगू भाषेतील तेलुगू थल्ली हा पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना प्रदान.

    १९९४ : विश्वकप फूटबॉलच्या अंतिम सामन्यात ब्राझिलने इटालीला पेनल्टी शूटआऊटमधे हरवले.

    २००० : अभिनेत्री नृत्यांगना वैजयंतीमाला बाली यांना भरतनाट्य शिखरमणी पुरस्कार जाहीर.

    २००४ : तामिळनाडुतील कुंभकोणम गावात एका शाळेला लागलेल्या आगीत ९० विद्यार्थी मृत्यूमुखी पडले.