१९ जुलै, दिनविशेष : अमेरिकेतील सेलम शहरात चेटकीण असल्याच्या आरोपाखाली स्त्रियांना फाशी देण्यात आली.; जाणून घ्या आजच्या दिवसाचे महत्त्व

  घटना.

  १६९२ : अमेरिकेतील सेलम शहरात चेटकीण असल्याच्या आरोपाखाली स्त्रियांना फाशी देण्यात आली.

  १८३२ : सर चार्ल्स हेस्टिंग्स यांनी ब्रिटिश मेडिकल असोसिएशन आणि सर्जिकल असोसिएशनची स्थापना केली.

  १९०० : पॅरिस मेट्रोची पहिली सेवा सुरु झाली

  १९०३ : मॉरिस गरीन यांनी पहिली टूर डी फ्रान्स स्पर्धा जिंकली.

  १९४० : दुसरे महायुद्ध – केप स्पादाची लढाई.

  १९४७ : म्यानमारच्या सरकारचे नियोजित पंतप्रधान आंग सान त्यांच्या मंत्री आणि सहकाऱ्यांची गॅलॉन सॉ याने हत्या केली.

  १९५२ : फिनलंड मधील हेलसिंकी येथे १५व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात.

  १९६९ : भारतातील १४ मोठ्या बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

  १९६९ : नील आर्मस्ट्राँग, एडवीन ऑल्ड्रिन व मायकेल कॉलिन्स या अंतराळवीरांसह अपोलो ११ हे अंतराळयान चंद्राच्या कक्षेत पोहोचले.

  १९७६ : नेपाळमधे सागरमाथा राष्ट्रीय उद्यानाची रचना करण्यात आली.

  १९८० : मॉस्को येथे २२व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

  १९९२ : कवी मजरुह सुलतानपुरी यांना इक्बाल सन्मान पुरस्कार जाहीर.

  १९९३ : डॉ. बानू कोयाजी यांना समाजसेवेसाठीचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.

  १९९६ : अमेरिकेतील अटलांटा येथे २६व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात.

  २०२० : भारतात ब्रह्मपुत्र नदीच्या पुरामुळे १८९ जण ठार आणि ४ दशलक्ष लोक बेघर झाले.