१६ जून दिनविशेष ; तंबाखूवर पूर्णपणे बंदी करणारा भूतान हा जगातील पहिला देश बनला.; जाणून घ्या आजच्या दिवसाची वैशिष्ट्ये!

    घटना.

    १९०३ :  फोर्ड मोटर कंपनीची सुरवात झाली.

    १९११ : न्यूयॉर्क येथे कॉम्प्युटिंग टॅब्युलेटिंग अँड रेकॉर्डिंग (आय. बी. एम.) कंपनीची स्थापना.

    १९१४ :  सहा वर्षांच्या तुरुंगवासातून लोकमान्य टिळक यांची सुटका.

    १९४७ : नव्या, कल्पक उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने म. स. तथा बाबुराव पारखे यांनी मराठा चेंबरच्या वतीने कै. गो. स. पारखे औद्योगिक पारितोषिक देण्यास सुरुवात केली.

    १९६३ : व्हॅलेन्तिनाते रेश्कोवा अंतराळ प्रवास करणारी पहिली महिला अंतराळयात्री बनली.

    १९९० : मुंबई उपनगरात दिवसभरातील सर्वाधिक वृष्टी झाली. १०४ वर्षातील एका दिवसात ६००.४२ मि.मी. पावसाचा उच्चांक.

    २०१० :  तंबाखूवर पूर्णपणे बंदी करणारा भूतान हा जगातील पहिला देश बनला.