११ जुलै दिनविशेष : मुंबईत उपनगरी गाड्यांमध्ये झालेल्या स्फोटांत २०९ लोक ठार तर ७१४ लोक जखमी झाले., जाणून घ्या आजच्या दिवसाचे महत्त्व

    घटना.

    १६५९ : अफझलखानाशी मुकाबला करण्यासाठी शिवाजी राजे राजगडवरून निघून प्रतापगड येथे पोचले.

    १८०१ : फ्रेन्च खगोलविद जॉन लुई पॉन याने पॉन धूमकेतूचा शोध लावला.

    १८९३ : कोकिची मिकीमोटो यांनी पहिला कल्चर्ड मोती मिळवला.

    १९०८ : लोकमान्य टिळकांना मंडालेची ६ वर्षाची शिक्षा ठोठवण्यात आली.

    १९१९ : नीदरलैंड मध्ये आठ तासांचा दिवस आणि रविवार सुट्टी असा कामगारांसाठी कायदा लागू झाला.

    १९३० : ऑस्ट्रेलिया चेसर डोनाल्ड ब्रॅडमन यांनी इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात विक्रमी नाबाद ३०९ धावा केल्या.

    १९५० : पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणे निधीचा (IMF) सदस्य बनला.

    १९५५ : अमेरिकेने चलनावर In God we trust (देवावर आमचा विश्वास आहे) असे छापण्याचे ठरवले.

    १९७१ : चिलितील तांब्याच्या खाणींचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

    १९७९ : अमेरिकेची स्कायलॅब ही अंतराळातील प्रयोगशाळा रात्री दहाच्या सुमारास हिंदी महासागरात कोसळली.

    १९९४ : पोलिस महानिरीक्षक किरण बेदी यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला.

    २००१ : आगरताळाते ढाका या शहरांदरम्यान बससेवा सुरू झाली.

    २००६ : मुंबईत उपनगरी गाड्यांमध्ये झालेल्या स्फोटांत २०९ लोक ठार तर ७१४ लोक जखमी झाले.