१२ जुलै दिनविशेष : महाराजा रणजित सिंग यांनी लाहोर ताब्यात घेतले आणि पंजाबचे सम्राट झाले.; जाणून घ्या आजच्या दिवसाचे महत्त्व

  घटना.

  १६७४ :  शिवाजी महाराजांनी इंग्रजांशी मित्रत्त्वाचा तह केला.

  १७९९ :  महाराजा रणजित सिंग यांनी लाहोर ताब्यात घेतले आणि पंजाबचे सम्राट झाले.

  १९२० :  पनामा कालव्याचे औपचारिक उद्‍घाटन झाले.

  १९३५ :  प्रभातचा चन्द्रसेना हा मराठी चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.

  १९६१ :  पानशेत, खडकवासला ही धरणे फुटल्यामुळे पुण्यातील पुरात २,००० लोक मृत्यूमुखी, १,००,००० लोक विस्थापित झाले.

  १९६२ :  लंडनमधील मार्क्वी क्लबमधे द रोलिंग स्टोन्स चा पहिला कार्यक्रम झाला.

  १९७९ :  किरिबातीला इंग्लंडपासुन स्वातंत्र्य मिळाले.

  १९८२ :  राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची (NABARD) स्थापना झाली.

  १९८५ :  पी. एन. भगवती भारताचे १७ वे सरन्यायाधीश झाले.

  १९९५ :  अभिनेते दिलीपकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

  १९९८ :  १६ व्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत यजमान फ्रान्सने गतविजेत्या ब्राझिलचा ३-० असा पराभव करुन विश्वकरंडक जिंकला.

  १९९९ :  महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार सुनील गावसकर यांना प्रदान.

  २००१ :  कृषीशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना टिळक पुरस्कार प्रदान.