१३ जुलै, दिनविशेष : मुंबई शहरात २०११ साली याच दिवशी झालेल्या बॉम्बस्फोटांत २६ जण ठार, तर १३० जण जखमी. ; जाणून घ्या आजच्या दिवसाचे महत्त्व

  घटना.

  १६६० : पावनखिंडीतील लढाई.

  १८३७ : राणी व्हिक्टोरिया बकिंगहॅम पॅलेस मध्ये राहायला गेली. तेव्हापासून ते इंग्लंडच्या राजाचे/राणीचे अधिकृत निवासस्थान बनले.

  १८६३ : सक्तीच्या सैन्यभरती विरोधात न्यूयॉर्क शहरात दंगा झाला.

  १९०८ : ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये स्त्रियांना भाग घेण्यास परवानगी.

  १९२९ : जतिंद्रनाथ दास यांनी लाहोर तुरुंगात आपले आमरण उपोषण सुरू केले. या उपोषणातच त्यांचा मृत्यू झाला.

  १९५५ : २८ वर्षीय रुथ एलिसला प्रियकराचा खून केल्याबद्दल फाशी दिली. ग्रेट ब्रिटनमधली स्त्रीकैद्याची अखेरची फाशी ठरली.

  १९७७ : रोहित्रावर वीज पडल्यामुळे न्यूयॉर्क शहरातील वीजपुरवठा २४ तास खंडित झाला.

  १९८३ :  श्रीलंकेत वांशिक हत्याकांड. ३,००० तामिळ व्यक्तींची हत्या. ४,००,००० हून अधिक तामिळींचे पलायन.

  २०११ :  मुंबई शहरात बॉम्बस्फोटांत २६ जण ठार, तर १३० जण जखमी.