१३ जून दिनविशेष ; पायोनियर-१० ही अंतराळयान सूर्यमाला सोडून जाणारी पहिली मानवनिर्मित वस्तू ठरली ; जाणून घ्या आजच्या दिवसाची वैशिष्ट्ये!

  घटना.

  १८८१ : यू. एस. एस. जीनेट आर्क्टिक समुद्रात नष्ट.

  १८८६ : कॅनडातील व्हॅनकूवर शहर आगीत बेचिराख.

  १९३४ : व्हेनिसमध्ये अॅडॉल्फ हिटलर आणि बेनिटो मुसोलिनी यांची भेट.

  १९५६ : पहिली युरोपियन चॅम्पियन कप फूटबॉल स्पर्धा रियल माद्रिदने जिंकली.

  १९७८ : इस्त्रायली सैन्याने लेबनॉनमधून माघार घेतली.

  १९८३ : पायोनियर-१० ही अंतराळयान सूर्यमाला सोडून जाणारी पहिली मानवनिर्मित वस्तू ठरली.

  १९९७ : दक्षिण दिल्लीतील उपहार सिनेमागृहाला लागलेल्या आगीत ५९ जण मृत्युमुखी पडले, तर सुमारे १०० जण जखमी झाले.

  २००० : स्पेन मधील माद्रिद येथे एकाच वेळी १५ स्पर्धकांविरुद्ध खेळताना ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याने बारा लढतीत विजय मिळविला.