१४ जून दिनविशेष ; मुघलांच्या कैदेत असलेल्या संभाजीराजे यांच्या मुलाचे औरंगजेबाने लग्न लावून दिले. ; जाणून घ्या आजच्या दिवसाची वैशिष्ट्ये!

  घटना.

  ११५८ : इसार नदीच्या काठावर म्यूनिच शहर स्थापन केले.

  १७०४ : मुघलांच्या कैदेत असलेल्या संभाजीराजे यांच्या मुलाचे औरंगजेबाने लग्न लावून दिले.

  १७७७: अमेरिकेने स्टार्स अँड स्ट्राइप्स या ध्वजाचा स्वीकार केला.

  १७८९ : मक्यापासुन पहिल्यांदाच व्हिस्की तयार करण्यात आली. तिला बोर्बोन असे नाव देण्यात आले.

  १८९६ : महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम ही संस्था स्थापन केली.

  १९०७ : नॉर्वेत स्त्रियांना मतदानाचा अधिकार.

  १९२६ : ब्राझील लीग ऑफ नेशन्समधून बाहेर.

  १९३८ : सुपरमॅनची चित्रपट कथा पहिल्यांदा प्रकाशित.

  १९४० : दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी पॅरिस जर्मनीच्या हवाली केले.

  १९४५ : भारताला स्वायत्तता देण्यासंबंधीची वेव्हेल योजना जाहीर.

  १९५२ : अमेरिकेने अणुशक्तीवर चालणारी पहिली पाणबुडी यू. एस. एस. नॉटिलस बांधण्यास सुरुवात केली.

  १९६२ : पॅरिसमध्ये युरोपियन अंतराळ संशोधन संस्था स्थापन झाली – नंतर युरोपियन स्पेस एजंसी बनली.

  १९६७ : मरिनर अंतराळ यान शुक्राकडे प्रक्षेपित.

  १९६७ : चीनने पहिल्या हायड्रोजन बॉम्ब ची चाचणी केली.

  १९७२ : डी. डी. टी. या कीटकनाशकाच्या वापरावर अमेरिकेत बंदी घालण्यात आली.

  १९९९ : दक्षिण आफ्रिकेचे पहिले श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला यांचा कायर्काळ संपला.

  २००१ : ए. सी. किंवा डी. सी. यापैकी कोणत्याही विद्युतप्रवाहावर चालणार्‍या उपनगरी गाडीचा (Electric Multiple Unit EMU) शुभारंभ पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक वासुदेव गुप्ता यांच्या हस्ते झाले.