१६ जुलै, दिनविशेष : भारताचे ९वे राष्ट्रपती म्हणून डॉ. शंकरदयाळ शर्मा यांची निवड झाली.; जाणून घ्या आजच्या दिवसाचे महत्त्व

  घटना.

  ६२२ :  प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी मदिनेहून प्रयाण केले. इस्लामिक हिजरी कॅलेंडरची या दिवसापासून सुरुवात झाली.

  १६६१ : स्वीडिश बँकेने युरोपमधील पहिल्या नोटा जारी केल्या.

  १९३५ : ओक्लाहोमा मध्ये जगातील पहिले पार्किंग मीटर बसवण्यात आले.

  १९४५ : अमेरिकेच्या पहिल्या अणुबॉम्बची चाचणी.

  १९६५ : ईटली व फ्रान्सला जोडणार्‍या माँट ब्लँक बोगद्याचे उद्‍घाटन झाले.

  १९६९ : चंद्रावर पहिला मानव उतरवणाऱ्या अपोलो-११ अंतराळयानाचे फ्लोरिडा येथून प्रक्षेपण.

  १९९२ : भारताचे ९वे राष्ट्रपती म्हणून डॉ. शंकरदयाळ शर्मा यांची निवड झाली.

  १९९८ : गुजरातमध्ये शाळेतील प्रवेशाच्या वेळी पाल्याच्या नावानंतर आईलाही नाव लावण्याच्या अधिकाराचा निर्णय.