१७ जून दिनविशेष; ताजमहाल जिच्यासाठी बांधला ‘ती’ मुमताज बाळाला जन्म देताना मरण पावली. ; जाणून घ्या आजच्या दिवसाची वैशिष्ट्ये!

  घटना.

  १६३१ : ताजमहाल जिच्यासाठी बांधला ती मुमताज बाळाला जन्म देताना मरण पावली.

  १८८५ : न्यूयॉर्क बंदरमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचे आगमन झाले.

  १९४० : दुसरे महायुद्ध–दोस्त राष्ट्रांनी फ्रान्समधून माघार घेण्यास सुरूवात केली.

  १९४४ : आइसलँडने (डेन्मार्कपासून) स्वातंत्र्य घोषित केले आणि ते प्रजासत्ताक बनले.

  १९६३ : अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक शाळांतून बायबलचे पठण करणे कायदेबाह्य ठरवले.

  १९६७ : चीनने पहिल्या हायड्रोजन बॉम्बचा स्फोट केला.

  १९९१ : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.

  २०१३ : भारताच्या उत्तराखंड राज्यात ढगफुटी होऊन एका दिवसात १३ इंच पाऊस पडला. शेकडो व्यक्ती मृत्युमुखी, हजारो यात्रेकरी अडकले.