१८ जुलै, दिनविशेष : उद्योगपती गोदरेज यांना जपानचा ऑर्डर ऑफ रायझिंग सन हा पुरस्कार प्रदान केला. ; जाणून घ्या आजच्या दिवसाचे महत्त्व

    घटना.

    ६४ :  रोममध्ये भीषण आग लागून जवळजवळ सगळे शहर भस्मसात झाले.

    १८५२ : इंग्लंडमधे निवडणुकांत गुप्त मतदान वापरण्यास सुरूवात झाली.

    १८५७ : मुंबई विद्यापीठाची स्थापना.

    १९२५ : अ‍ॅडॉल्फ हिटलर यांनी माइन काम्फ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक प्रकाशित केले.

    १९६८ : कॅलिफोर्निया येथे इंटेल (Intel) कंपनीची स्थापना.

    १९७६ : मॉन्ट्रिअल ऑलिम्पिक खेळात नादिया कोमानेसीने जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत प्रथमच १० पैकी १० गुण मिळवले.

    १९८० : भारताने एस. एल. व्ही.-३ या अवकाशयानाद्वारे रोहिणी-१ या उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केले.

    १९९६ : उद्योगपती गोदरेज यांना जपानचा ऑर्डर ऑफ रायझिंग सन हा पुरस्कार प्रदान केला.

    १९९६ : तामिळ टायगर्सनी श्रीलंकेचा सैनिक तळ ताब्यात घेऊन सुमारे १२०० जवानांना ठार केले.