२० जून दिनविशेष; अमेरिकेत कामगारांसाठी ८ तासांचा दिवस निश्चित करण्यात आला. जाणून घ्या आजच्या दिवसाची वैशिष्ट्ये

    घटना.

    १८३७ : इंग्लंडच्या राणीपदी व्हिक्टोरिया यजमान झाल्या.

    १८४० : सॅम्युअल मोर्स यांना टेलिग्राफचा पेटंट मिळाला.

    १८६३ : वेस्ट व्हर्जिनिया अमेरिकेचे ३५ वे राज्य बनले.

    १८७७ : अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी कॅनडा मध्ये जगातील पहिल्या व्यावसायिक दूरध्वनी सेवेची सुरवात केली.

    १८८७ : देशातील मुंबई येथील सर्वाधिक गर्दीचे स्टेशन व्हिक्टोरिया टर्मिनस (सध्याचे नाव सी. एस. टी.) सुरू झाले.

    १८९९ : केंब्रिज विद्यापीठाच्या ट्रायपॉस या गणिताच्या अंतिम परीक्षेत रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे पहिल्या वर्गात पहिले आल्यामुळे त्यांना सिनिअर रॅंग्लर होण्याचा बहुमान मिळाला.

    १९२१ : टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना झाली.

    १९६० : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची स्थापना झाली.

    १९९० : ७.४ मेगावॅटचा भूकंपात इराण मध्ये ५०,००० लोक ठार तर १,५०,००० पर्यंत जखमी झाले.

    १९९७ : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे राज्यातील पहिली मुलींची सैनिकी शाळा पुण्याजवळ सुरू झाली.

    २००१ : परवेझ मुशर्रफ पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झाले.