२१ जुलै दिनविशेष : १९६० साली सिरीमाओ बंदरनायके या श्रीलंकेच्या ६व्या पंतप्रधान बनल्या. ‘त्या’ जगातील पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. ; जाणून घ्या आजच्या दिवसाचे महत्त्व

    घटना.

    इ.स. पूर्व ३५६ : जगातील सात आश्चर्यांपैकी एक एफिसस आर्टेमिसचे मंदिर नष्ट झाले.

    १८३१ : बेल्जिअमचा पहिला राजा लिओपॉल्ड याचा शपथविधी झाला.

    १९४४ : २० जुलै १९४४ रोजी अ‍ॅडॉल्फ हिटलरची हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या क्लाऊस व्हॉन स्टाऊफेनबर्गला फाशी.

    १९६० : सिरीमाओ बंदरनायके या श्रीलंकेच्या ६ व्या पंतप्रधान बनल्या. त्या जगातील पहिल्या महिला पंतप्रधान आहेत.

    १९७६ : आयर्लंडमधील ब्रिटिश राजदूताची हत्या.

    १९८३ : अंटार्क्टिका वरील व्होस्टॉक येथे उणे ८९.२ सेल्सियस या पृथ्वीवरील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद केली गेली.

    २००२ : जगभर दूरसंचार सेवा पुरवणाऱ्या वर्ल्ड कॉम या अमेरिकन कंपनीने दिवाळखोरी घोषित केली.