२२ जुलै दिनविशेष : ‘देशाचे दुर्दैव’ हा जहाल अग्रलेख लिहिल्याबद्दल लोकमान्य टिळकांना ६ वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली. ; जाणून घ्या आजच्या दिवसाचे महत्त्व

    घटना.

    १९०८ : देशाचे दुर्दैव हा जहाल अग्रलेख लिहिल्याबद्दल लोकमान्य टिळकांना ६ वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा.

    १९३१ : फ़र्ग्युसन महाविद्यालयाच्या ग्रंथालयात वासुदेव बळवंत गोगटे यांनी सर जॉन हॉटसन या मुंबई प्रांताच्या राज्यपालावर गोळया झाडल्या. हॉटसन वाचला.

    १९३३ : विली पोस्ट या वैमानिकाने ७ दिवस १८ तास ४९ मिनिटे या विक्रमी वेळेत विमानातून पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली.

    १९४२ : वॉर्सा मधुन ज्यूंना हद्दपार करणे सुरू झाले.

    १९४४ : पोलंडमधे कम्युनिस्ट राजवटीची सुरुवात झाली.

    १९४६ : इर्गुनया दहशतवादी संघटनेने जेरुसलेम मधील ब्रिटिश मुख्यालयावर बॉम्ब हल्ला केला. त्यात ९० ठार.

    १९७७ : चीनचे नेते डेंग क्सियाओ पिंग पुन्हा सत्तेवर आले.

    १९९३ : वेषभूषाकार भानू अथैय्या यांना अमेरिकेतील अ‍ॅकेडमी ऑफ मोशन पिक्‍चर आर्ट अँड सायन्स या संघटनेचे सदस्यत्त्व देण्यात आले.

    २००१ : जागतिक जलतरण स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा जलतरणपटू इयान थॉर्प याने ४०० मीटर फ्रीस्टाइल शर्यत ३ मि. ४०.१७ सेकंदांत जिंकली.