२६ जुलै दिनविशेष : मुंबई परिसरात २००५ साली २४ तासांत सुमारे ९९५ मिमी पाऊस, पूर येऊन शेकडो लोक मृत्युमुखी पडले; जाणून घ्या आजच्या दिवसाचे महत्त्व

    घटना.

    १५०९ : सम्राट कृष्णदेवराय यांनी विजयनगर साम्राज्याच्या पुनरुत्पादन सुरूवात केली.

    १७८८ : न्यूयॉर्क अमेरिकेचे ११वे राज्य बनले.

    १७४५ : इंग्लंडमध्ये गिल्डफोर्ड येथे महिलांचा पहिला क्रिकेट सामना.

    १९५६ : जागतिक बॅंकेने आस्वान धरण बांधण्यासाठी अर्थसाहाय्य करण्यास नकार दिल्यावर ईजिप्तचे राष्ट्राध्यक्ष गमाल नासर यांनी सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण केले.

    १९९८ : बुद्धिबळातील कामगिरीबद्दल विश्वनाथन आनंद याला प्रतिष्ठेचा चेस ऑस्कर पुरस्कार जाहीर.

    १९९९ : क्रिकेटच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी माजी कर्णधार पॉली उम्रीगर यांना सी. के. नायडू पुरस्कार जाहीर.

    १९९९ : भारताचा कारगिल युद्धात विजय झाला.

    २००५ : मुंबई परिसरात २४ तासांत सुमारे ९९५ मिमी पाऊस, पूर येऊन शेकडो लोक मृत्युमुखी पडले.

    २००८ : अहमदाबाद, बॉम्बस्फोटांमधे ५६ ठार २०० जखमी झाले.