२८ जून दिनविशेष : संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्‍काविषयक सार्वत्रिक जाहीरनाम्याला पन्‍नास वर्षे पूर्ण झाली. ; जाणून घ्या आजच्या दिवसाचे महत्त्व

    घटना.

    १८३८ : इंग्लंडची राणी व्हिक्टोरि यांचा राज्याभिषेक झाला.

    १८४६ : अ‍ॅडॉल्फ सॅक्स यांनी सॅक्सोफोन या वाद्याचे पेटंट घेतले.

    १९२६ : गोटलिब डेमलर आणि कार्ल बेन्झ यांनी त्यांच्या दोन कंपन्यांचे एकत्रीकरण करून मर्सिडीज-बेंझची स्थापना केली.

    १९७२ : दुसऱ्या भारत-पाक युद्धानंतर सिमला परिषदेस प्रारंभ झाला.

    १९७८ : अमेरिकेतील सर्वोच्‍व न्यायालयाने महाविद्यालयातील प्रवेशात आरक्षण बेकायदा ठरवले.

    १९९४ : विश्वकरंडक फूटबॉल स्पर्धेत रशियाच्या ओलेम सेलेन्को याने कॅमेरुनविरुद्ध पाच गोल करुन ऐतिहासिक कामगिरी केली.

    १९९७ : मुष्टियुद्धात इव्हांडर होलिफील्डच्या कानाचा चावून तुकडा तोडल्यामुळे माइक टायसनला निलंबित करून होलिफील्डला विजेता घोषित करण्यात आले.

    १९९८ : संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्‍काविषयक सार्वत्रिक जाहीरनाम्याला पन्‍नास वर्षे पूर्ण झाली.