०५ जुलै दिनविशेष : बीबीसीने पहिले टेलिव्हिजन बातम्या बुलेटिन प्रसारित केले.; जाणून घ्या आजच्या दिवसाचे महत्त्व

    घटना.

    १६८७ : सर आयझॅक न्यूटन यांनी फिलोसॉफी नॅचरालिस प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका हे अतिमहत्त्वाचे पुस्तक प्रकाशित केले.

    १८११ : व्हेनेझुएलाला स्पेनपासुन स्वातंत्र्य मिळाले.

    १८३० : फ्रान्सने अल्जीरीया पादाक्रांत केला.

    १८४१ : थॉमस कुक यांनी लेस्टर ते लोफबरो अशी पहिली सहल आयोजित केली.

    १८८४ : जर्मनीने कॅमॅरून हा देश ताब्यात घेतला.

    १९०५ : लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली.

    १९१३ : बालगंधर्वांनी गंधर्व नाटक मंडळीची स्थापना केली.

    १९४६ : फ्रान्स फॅशन शोमध्ये पदार्पण केल्यानंतर बिकिनीची विक्री सुरु.

    १९५० : इस्रायलच्या क्वेन्सेटने जगातील ज्यू व्यक्तीला इस्रायलमध्ये राहण्याचा हक्क दिला.

    १९५४ : आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना.

    १९५४ : बीबीसीने पहिले टेलिव्हिजन बातम्या बुलेटिन प्रसारित केले.

    १९६२ : अल्जीरीयाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले

    १९७५ : देवी या रोगाचे भारतातून समूळ उच्चाटन झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जाहीर केले.

    १९७५ : केप व्हर्डेला पोर्तुगालकडून स्वातंत्र्य मिळाले.

    १९७५ : विम्बल्डन एकेरी लॉन टेनिस स्पर्धा जिंकणारा आर्थर अ‍ॅश हे पहिले कृष्णवर्णीय खेळाडू बनले.

    १९७७ : पाकिस्तानमध्ये लष्करी उठाव. झुल्फिकार अली भुत्तो तुरुंगात.

    १९८० : स्वीडन टेनिसपटू ब्योर्न बोरग यांनी विम्बल्डन एकेरी लॉन टेनिस स्पर्धा सलग पाच वेळा जिंकली.

    १९९६ : डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि एन. पंत यांना आर्यभट्ट पुरस्कार जाहीर.

    १९९७ : स्वित्झर्लंडच्या १६ वर्षाच्या मार्टिना हिंगीसने चेक प्रजासत्ताकाच्या याना नोव्होत्नाला पराभूत करून विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद जिंकण्याची कामगिरी केली.

    २००९ : अँडी रॉडीकला विम्बल्डनमधे पराभूत करुन रॉजर फेडररने विक्रमी १५ वे ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकले.

    २०१२ : ३१० मीटर (१०२० फूट) उंचीसह लंडनमधील द शर्ड ही युरोपमधील सर्वात उंच इमारत ठरली.